हीरक महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रात पुस्तकांची अत्यावश्यकता दुर्लक्षित राहावी, हे दुर्दैव आहे...
नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पुस्तकांना ‘अत्यावश्यक वस्तू’ म्हणून दर्जा मिळावा आणि पुस्तक विक्री ही औषध व अन्नधान्य विक्री याप्रमाणे अत्यावश्यक सेवा समजली जावी, अशी मागणी या यचिकेत केली आहे. ही मागणी काहींना हास्यास्पद वाटू शकते, काहींना ती अजब वाटू शकते, परंतु थोडा खोलात जाऊन विचार केला, तर आपल्याला मानवी आयुष्यात ग्रंथांचं स्थान किती मोलाचं आहे, हे लक्षात येईल.......